व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अखेर सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एनआयएच्या टीमने अटक केल्यानंतर सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी कोडडीत रवानगी झाल्यानंतर आता मुंबई पोलीस दलाकडून अखेर सचिन वाझे यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group