Thursday, October 6, 2022

Buy now

पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही; सदाभाऊंचा शरद पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करताना म्हंटल होत की, काही लोक म्हणायचे की मी पुन्हा येईन मात्र आम्ही काय त्यांना परत येऊ दिले नाही. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधत जळजळीत टीका केली.

सदाभाऊ खोत यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की !! सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस कडून नेमकं काय प्रत्युत्तर येते हे देखील पाहावं लागेल.

दरम्यान, यापूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पवारांवर निशाणा साधत फडणवीस हे शरद पवारांच्या डोळ्यात खुपतात असे म्हंटल होत. तसेच तुम्ही पावसात भिजूनही तुमचे फक्त 54 च आमदार निवडून आले तसेच गेल्या 30 वर्षात तुम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता मुख्यमंत्री पदावर बसवता आला नाही असा टोलाही लगावला होता

पवार नेमकं काय म्हणाले-

निवणडणूक लागायच्या अगोदर, निकाला आधीच काही लोक मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले.