तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले; सदाभाऊंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असतानाच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार वर निशाणा साधला आहे. तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

आर्यन खान गांजा पितो की बिडी ओढतो याचे काही जनतेला देणेघेणे नाही. मात्र आर्यन खानला पाठींबा देण्यासाठी अर्धे मंत्रीमंडळ उभे आहे. त्यामुळे तीन पक्षाच्या सरकारने राज्य गांजाडे आणि दारूडयांचे बनवले आहे अशी जळजळीत टिका सदाभाऊ खोत यांनी केली
पवार साहेब म्हणाले की मलिकांच्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली, पण याच संशोधन कुठे केलं, त्याच बियाणे तरी मिळत हा महाराष्ट्रात अस म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

या तीन पक्षाचे सरकार कुणाचं काय चाललंय हे कळत नाही. या दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत. या दोन वर्षात दोन महिने सुद्धा मंत्रालयात गेले नाहीत. वर्षा बांगला तर ओस पडला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा ते मंत्रालयात आमदारासाठी कायम उपस्थित असायचे. वर्षा बंगला तर पहाटे चार वाजल्यापासून उघडा असायचा असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटल.

You might also like