आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटना या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं समजत आहे. त्यातच आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिल्यानंतर एसटी संप मिटण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याचं समजत आहे. भावनिक विचार न करता आर्थिकदृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी 10 वाजता काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करु.

दरम्यान, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, मात्र आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही पडळकर यांनी सांगितलं आहे

Leave a Comment