अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली, आता खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब?; सदाभाऊंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेलं बघायचं असून कार्यकर्त्यांनी हीच भावना मनात ठेवून अजितदादांच्या मागे ताकद उभा करावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.

भविष्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, या भौतिक प्रश्नात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रस नाही. आताच्या घडीला महापूर अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली आहे, मग आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत केला आहे.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले-

आदरणीय शरद पवार साहेब यांना देशाचे पंतप्रधान आणि अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना आपल्याला बघायचं आहे. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.