गोपाळ रुपी वारकरी तुरुंगात, मुख्यमंत्री थेट पंढरपूरात…; सदाभाऊंची सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने आषाढी पायी वारीला राज्य सरकारने परवानगी नाकारली. यामुळे अनेक वारकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

‘विठू माझा लेकरूवाळा, संगे गोपाळाचा मेळा.गोपाळ रुपी वारकरी तुरुंगात व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यासाठी थेट पंढरपूरात…वा रे …वा अजब तुझे सरकार…!,’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत केली आहे.

दरम्यान यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली होती. तर मानाच्या १० पालख्या काल शिवशाही बसने पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील स्वतः गाडी चालवत कालच पंढरपूरला गेले होते. त्यांच्या हस्ते आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.

Leave a Comment