Thursday, October 6, 2022

Buy now

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊंचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल; भाजप पाठिंबा देणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधानपरिषदसाठी निवडणूक होणार असून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. मात्र सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज भाजपकडून नव्हे तर अपक्ष म्हणून भरण्यात आला आहे. मात्र सदाभाऊंच्या उमेदवारी ला भाजपचा पाठिंबा असेल.

सदाभाऊ खोत हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  त्यामुळे पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भाजपा प्रयत्न करणार आहे. तसेच, उर्वरीत चार अर्ज उद्या दाखल केले जाणार आहेत असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपकडून विधान परिषदेसाठी यापूर्वीच राम शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, आणि , भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारी साठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पंकजाताईंना वेगळी काही जबाबदारी सोपवायची असेल. यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.