शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सदाभाऊंचे घरासमोर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२ जिल्हयांमध्ये शासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लघंन न करता अंगण हेच आंदोलन हे ऐतिहासिक डिजिटल आंदोलन पार पडले. डिजिटल आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अन्यथा भविष्यात सरकारची झोप उडवणारे अनोखे आंदोलन केले जाईल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्र्वभुमीवर कोणताही अर्थतज्ञ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा आकडा सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत करोडो लोकांच्या मजुरांच्या हाताला काम देणारा व हजारो व्यवसायिकांना हजारो कंपन्यांना व्यवसाय देणारा, हजारो कोटी कर देणारा शेती हा उद्योग अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उभारी देण्याची गरज असताना शेतकरी कर्जमाफीचे घोंगडे भिजत ठेवलेले आहे. कृषी पंप वीज बिलातून शेतकऱ्यांना पूर्ण मुक्त करणे गरजेचे आहे. आज कोरोनाचे संकट पुढे असले तरी अन्नधान्याचा पुरवठा व निर्मिती करण्याची फार मोठी जबाबदारी शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजुर व इतर छोटे मोठे व्यावसायिक यांच्यामध्ये शासनाच्या धोरणावर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा कोणताही शेतीमाल मार्केटींग व्यवस्था कोलमडुन पडल्यामुळे शेतामध्ये पिकवीलेला माल योग्य भावात योग्य ठिकाणी विकु शकत नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. म्हणूनच राज्य शासनाचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा मागण्या संघटनेने सरकारकडे केले आहेत. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सर्व नियम पाळून स्वतःच्या अंगणात घरात अगदी गाईच्या गोठ्यामध्ये सुद्धा हे प्रतिकात्मक आंदोलन पार पडले.

Leave a Comment