खोटं बोल पण रेटून बोल असा सरकारचा कारभार; सदाभाऊंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने विरोधकांकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अजित पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलेला होता की ३१ जुलै च्या अगोदर राज्यातील MPSCच्या सर्व जागा भरू आणि रखडलेल्या नियुक्त्या सुद्धा दिल्या जातील असा शब्द सभागृहाला दिला होता. तसेच MPSCसाठी जो आयोग आहे त्यावरील सदस्य सुद्धा तातडीने त्यांचीही नियुक्ती करू.परंतु एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. असे सदाभाऊ खोत यांनी म्हणलं

अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत कारण हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. १५ ऑगस्ट पर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत.व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर १५ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू.असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटल

Leave a Comment