वैतरणा नदीपात्रात 15 तास अडकलेल्या सर्व 10 कामगारांची NDRF कडून सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच काल पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात 10 कामगार अडकले होते. गेल्या 15 तासांपासून अडकून पडलेल्या सर्व कामगारांची NDRF च्या पथकाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मुंबई-बडोदा महामार्गवर उड्डाणपुलाचे काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आला. त्यामुळे पुलाचे काम करणारे 10 कामगार त्याच ठिकाणी अडकून पडले होते. आज सकाळी एनडीआरएफचे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या अडकून पडलेल्या कामगारांची सुटका केली.

पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच नदीकाठी असलेल्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काल दुपारनंतर वैतरणा नदीला पूर आला होता. त्यावेळी नदीवर असलेल्या पुलाच्या बार्जमध्ये काही कामगार काम करत होते. पण अचानक नदीला पूर आल्याने कामगारांना बाहेर पडता आले नाही.

दरम्यान, एनडीआरएफचे पथक रात्रीच अडकलेल्या कामगाराच्या ठिकाणापासून काही अंतरावर दाखल झाले. मात्र, अंधार असल्याने त्यांच्याकडून बचावकार्याची मोहिम थांबवण्यात आली होती. पण सकाळी पुन्हा ही मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली. आणि सकाळी कामगारांना बाहेर काढण्यात पथकास यश मिळाले.

Leave a Comment