हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sagargad Fort) आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा आणि गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची तर साता समुद्रापार देखील चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सर्व प्रयत्नांनी विविध किल्ले जिंकले. काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे खास नमुने म्हणून प्रसिद्ध आहेत. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही मजबूत आहेत. जे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत जात असतात. अशाच एका खास किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेत आहोत.
सागरी मार्गे आक्रमण करणाऱ्या शत्रुंना रोखण्यासाठी तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक जलदुर्ग होते. यामध्ये अंजनवेल, मुरुड – जंजिरा, अर्नाळा, गोपाळगडसारख्या किल्ल्यांचा समावेश आहे. (Sagargad Fort) मात्र, महाराष्ट्रात एक असा अनोखा किल्ला आहे ज्याच्या आसपास समुद्र किंवा पाण्याचा कोणताही स्रोत नाही आणि तरीसुद्धा या गडावरून थेट समुद्रावर लक्ष ठेवले जायचे. या किल्ल्याचे नाव आहे ‘सागरगड’. चला तर या अनोख्या किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेऊ.
सागरगड किल्ला (Sagargad Fort)
सागरगड हा किल्ला दुर्लक्षित किल्ल्यांपैकी एक आहे. फार कमी लोकांना या किल्ल्याविषयी माहिती आहे. शिवरायांचा ‘सागरगड’ हा किल्ला अलिबागजवळील एका डोंगरावर वसला आहे. आता महत्वाचे असे की, या किल्ल्याचे नाव भले सागरगड असेल पण प्रत्यक्षात हा किल्ला समुद्र किनार्यापासून एक दोन नव्हे तर तब्बल पाच मैल दूर आहे. मात्र तरीही या किल्ल्यावरून समुद्री हालचालींवर लक्ष ठेवता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सागरी किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठीचं नेमला होता.
सागरगड किल्ल्याचा इतिहास
(Sagargad Fort) सागरगड किल्ला हा कोणी आणि कधी बांधला याविषयी पक्की माहिती उपलब्ध नसली तरी त्याच्या रचनेवरून हा किल्ला निजामशाहीत बांधला गेला असावा असा अंदाज वर्तवला जातो. तसेच असेही सांगितले जाते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला होता.
सागरगड किल्ल्याची रचना
सागरगड हा किल्ला अलिबागमध्ये ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी एक ओढा आहे. तो ओलांडून डोंगरपायथ्याशी जाता येते. किल्ल्यावर चढताना नागमोडी वळणाची वाट लागते. यामुळे ट्रेकिंग करताना बरंच दमायला होत. (Sagargad Fort) या किल्ल्यावर असलेल्या उंचवट्याला ४ मीटर उंचीची तटबंदी असून इथे ५ भव्य बुरुज पाहायला मिळतात.
या किल्ल्यावर मंदिर आणि पाण्याचे कुंडदेखील आहे. या कुंडात एक गोमुख आहे. ज्यामध्ये नितळ पाण्याची संततधार असते. या किल्ल्यावरुन खांदेरी- उंदेरी किल्ले, अलिबागचा सुंदर समुद्रकिनारा, धरमतरची खाडी, माथेरान आणि प्रबळगड दिसतो. (Sagargad Fort)