Sagvaan Tree Cultivation | शेतात ‘या’ झाडांची लागवड करा आणि महिन्याला कमवा लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sagvaan Tree Cultivation | आजकाल शेतकरी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामुळे आता शेती हे केवळ एक उपजीविकेचे साधन न राहता ते शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन बनलेले आहे. आपल्या भारताची 50 टक्के अर्थव्यवस्था शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी व्यावसायिक दृष्टीने शेती करतात. यंत्र आल्यामुळे शेतकरी कमी मेहनतीमध्ये आजकाल खूप जास्त उत्पादन घेऊ शकतात. त्याचा त्यांना आर्थिक दृष्टीने खूप फायदा होतो.

शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन आर्थिक उत्पादन वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. आता आज आपण शेतीचा असा एक नवीन पर्याय पाहणार आहोत, ज्याच्या माध्यमातून शेतकरी मोकळ्या जागेचा देखील उपयोग करून लाखो रुपये कमवू शकतात.

मोकळ्या जागेत करा सागाची लागवड | Sagvaan Tree Cultivation

झाड हे मानवासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. झाड हा मानवासाठी ऑक्सिजनचा प्रमुख स्रोत आहे. त्याचप्रमाणे झाडांपासून आपल्याला फळे, फुले, औषध तसेच इतर गोष्टी देखील मिळत असतात. परंतु या झाडातून आर्थिक उत्पन्न देखील होत असतो. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक दृष्टिकोनातून विविध झाडांची लागवड करत असतात.

उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केला तर सागाची लागवड (Sagvaan Tree Cultivation) खूप फायद्याची आहे. साग हा वृक्ष सगळ्यांसाठी खूप फायदाच आहे. सागाची लाकडे ही मौल्यवान असतात. त्याचप्रमाणे फर्निचर बनवण्यासाठी देखील या लाकडाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहे. सागाच्या झाडाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याच्या लाकडाला कधीच वाळवी लागत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या लाकडांपेक्षा या लाकडाची किंमत जास्त असते.

सागाची लागवड कशी करावी ?

सागाची लागवड (Sagvaan Tree Cultivation)करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करून आठ बाय आठ फूट आणि एक बाय एक फुटाचे खड्डे खोदावे लागतात. खड्डे खोदल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हे खड्डे तापवून द्यावे लागतात. त्यानंतर मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जो पहिला पाऊस पडतो तो पडल्यानंतर या खड्ड्यांमध्ये शेणखत आणि बुरशी नाशक आणि थायमिट टाकून ते भरावे लागतात. आणि त्यामध्ये रोपांची लागवड करावी लागते. लागवड झाल्यानंतर त्यांना पावसाचे पाणी जास्त झाले तर बेड असल्याकारणाने झाडांच्या मुळाशी पाणी राहते.

सागाच्या लागवडीचा उत्तम काळ | सागाच्या लागवडीचा उत्तम काळ

जून, जुलै आणि ऑगस्टची साग लागवडीसाठी अत्यंत उत्तमकालावधी आहे. या कालावधीमध्ये वातावरणात ओलावा असतो. त्याचप्रमाणे पाऊस पडत असल्याने झाडांना सतत पाणी मिळते आणि झाडे देखील चांगली होतात.

सागाच्या लागवडीची योग्य जात

कोन्नी सागवान, पश्चिमी आफ्रिकन सागवान, गोदावरी सागवान, दक्षिण आणि आणि मध्य आफ्रिकन सागवान आणि निलंबर सागवान या सागाच्या काही प्रमुख जाती आहेत. त्यापासून खूप चांगला फायदा मिळतो. तसेच त्यांच्या लागवडी करता लोक लागवड करताना टिशू कल्चरची रोपे लावली जातात. ती रोपे एकदम सरळ वाढतात तसेच उंच वाढतात त्याचप्रमाणे त्यांना दुसरे फाटे फुटत नाही.

हे सागाचे लाकूड (Sagvaan Tree Cultivation) सरळ असल्याने त्यांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. तुम्ही सरकारमान्य नर्सरीमधून ही झाडे उपलब्ध करून घेऊ शकता. टिशू कल्चरचा फायदा म्हणजे इतर लोकांपेक्षा ते जलद गतीने वाढतात आणि शेतकरी एक दोन एकर क्षेत्रावर सागाची लागवड करून देखील खूप चांगला पैसा कमवू शकतात.