Sahyadri Tiger Reserve : सह्याद्रीत वाढतेय वाघांची संख्या!! SKT02 वाघीण ठरतेय वंशवाढीची जननी

Sahyadri Tiger Reserve
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sahyadri Tiger Reserve। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प…. महाराष्ट्रातील चांदोली, कोयना अभयारण्यापासून ते दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र… याच सह्याद्रीच्या कुशीत वाघांचे अस्तित्व आहे… वन विभागाच्या मदतीने हा अधिवास अभ्यासण्याचे काम ‘वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मागच्या काही वर्षात या ठिकाणच्या वाघांची संख्या कमी होत असल्याचं बोललं जात असलं तरी आता सह्याद्रीत वाघांचा वंश वाढताना दिसतोय… आणि या वंशवाढीची जननी ठरत आहे ती म्हणजे SKT02 वाघीण…. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील SKT02 वाघिणीने दशकभरात तीनवेळा पिल्लांना दिला जन्म आहे. तिच्या पिल्लानीही नवीन बछड्याना जन्म दिल्याने सह्याद्रीतील वाघांची संख्या ११ ते १२ झाली आहे. तर एकूण व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या हि तब्बल ३२ वर पोहचली आहे. वन्यजीव संरक्षणाचं हे एक मोठं फलित म्हणावं लागेल.

SKT02 वाघीण हि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (Sahyadri Tiger Reserve) अत्यंत महत्वाची अशी वाघीण ठरली. अंदाजे 15 वर्षाची असणारी ही वाघीण आजही जंगलात मनसोक्त फिरत असते. SK म्हणजे सह्याद्री-कोकण, T म्हणजे टायगर आणि 02 म्हणजे क्रमांक….गेल्या दशकभरात सह्याद्री-कोकण पट्ट्यातील वाघांच्या वंशवृद्धीचा पाया या वाघिणीने रचला. तिच्या पिल्लानीही मधल्या काळात नवनवीन बछड्याना जन्म दिल्याने SKT02 वाघीण आता आज्जी झाली आहे. SKT02 वाघिणीने २०१३ ते २०२५ या काळात ३ वेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद आहे. SKT02 वाघिणीने २०१३, २०१५ आणि २०१७ अशा ३ वेळा बछड्याना जन्म दिला. तिच्या पिल्लांपैकी SKT04 मादीने नंतरच्या काळात ३ पिल्लाना जन्म दिला.

वाघांची संख्या कशी वाढली ? Sahyadri Tiger Reserve

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या संचार मार्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. सह्याद्रीत वाघांची संख्या वाढण्यामागे वनविभागाने सुद्धा मोठे कष्ट घेतलं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची संपूर्ण क्रियावाली हि भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जात आहे. हा भाग दुर्गम, डोंगराळ आणि घनदाट जंगल आहे. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो.. त्यामुळे गवत उगवण्याचे प्रमाण जास्त आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक धबधबे, झरे, पाणलोट क्षेत्र आहेत. कोयना, शिवसागर जलाशय, वसंत सागर, चांदोली सारखी धरणे आहेत. अनेक प्रकारच्या प्रजातीच्या वनस्पती आहेत. त्यामुळे हरीण, काळवीट, गवा, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. साहजिकच वाघांना हवं असणार भक्ष्य सुद्धा त्यामुळे लागेचच सापडतात… जिथे भक्ष्य आहे तिथेच वाघ जातो आणि राहतो. त्यामुळे संपूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या याठिकाणी सुमारे 32 वाघ असून, त्यापैकी ११ ते १२ वाघ हे महाराष्ट्रात आहेत.