साई जन्मस्थानाचा राजपत्रांमध्ये उल्लेख; वयोवृद्ध अभ्यासकाकडे साईस्थानाचा शासकिय पुरावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

काल मुख्यमंत्र्यांनी शिर्डी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पाथरी साई जन्मस्थान कमिटीचे विश्वस्त व सर्वपक्षीय सदस्य पुढील दोन दिवसात जाणार आहेत. आज पाथरी येथे साईमंदीरात झालेल्या ग्रामस्थांच्या ठराव बैठकीवेळी ठरले आहे .यावेळी ते मुख्यमंत्र्यांना साई जन्मस्थानाचे पुरावे दाखवणार आहेत.

त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा १९६७ मध्ये प्रकाशित झालेला ‘गॅझेटिअर ‘ हा शासकीय कागदी पुरावा दाखवण्यात येणार आहे. सदरील पुरावा पाथरी येथील परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते व सर्व धर्मांच्या पुस्तकांचे गाडे अभ्यासक बी. एस. कांबळे यांनी आतापर्यंत जोपासून ठेवला आहे. मीडियामध्ये साई जन्मस्थान वादाच्या बातम्या पाहिल्यानंतर त्यांनी हा पुरावा श्री साईबाबा जन्मस्थान समितीचे विश्वस्त व कृती समिती अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना दाखवला आहे. आता पाथरीकरांकडून दाखवण्यात येणाऱ्या २९ धार्मिक पुराव्यांमध्ये तो महत्वाचा शासकीय पुरावा असणार आहे.

१९६७ मध्ये प्रकाशीत इंग्रजी गॅझेटिअर चा तत्कालीन सचिव कि.का. चौधरी यांनी १९८८मध्ये मराठी अनुवाद प्रसिद्ध केला असल्याचे बी .एस .कांबळे सांगतात. २००६ मध्ये त्यांच्या अभ्यासासाठी मुंबई येथील प्रसिद्धी संचालनयातून या राजपत्राची एक प्रत खरेदी केली .ती आता साई जन्मस्थानाचा प्रबळ पुरावा म्हणून मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-  

साईबाबांचे जन्मस्थान पाथरीच! ग्रामसभेचा एकमुखी ठराव; जिल्ह्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

साईबाबा जन्मस्थळाचा वाद संपुष्टात; मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घेतलं

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

Leave a Comment