शिर्डी | साई बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्डी नगरीत गुरू पौर्णिमेचा उत्सव आज पहाटे सुरू झाला आहे. पहाटे साईंची पालखी वाजत गाजत द्वारकामाईमध्ये आणण्यात आली. समाधी मंदिरात सेज आरती झाली आणि गुरू पौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली
दर गुरुवारी शिर्डीत साई पालखी सोहळा संपन्न होतो. साईबाबांच्या पावलांची प्रतिकृती साई बाबांचा फोटो पालखीत ठेवून शिर्डीच्या विशिष्ठ मार्गाने पालखी सोहळा व्दारकामाईमध्ये आणण्यात येतो. अनेक वर्षांची ही परंपरा असल्याचे सांगण्यात येते.
गुरु पौर्णिमेलाचा हा उत्सव पुढील तीन दिवस चालनार आहे. मुंबई पुणे नाशिक याच बरोबर राज्यातील अनेक शहरातून गुरू पौर्णिमेनिमित्त शिर्डीत पालख्या आणि दिंड्या दाखल झाल्या आहेत. दिंड्या दाखल झाल्याने शिर्डीला पंढरीचे रूप आले आहे.