Wednesday, June 7, 2023

‘ज्या ताटातं खाल्लं त्यातचं..’ मुंबईला बदनाम करणाऱ्या कंगना राणावतला मराठी कलाकारांनी चांगलचं झापलं

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत ही मुंबई पोलीस व ठाकरे सरकारवर घसरली. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर मुंबईवर मनापासून प्रेम करणाऱ्या मराठी कलाकार कंगनाच्या या विरोधात एकवटले आहेत. मराठी कलाकारांनी कंगनाला आपल्या ट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे.

कंगना हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. ‘मुंबई हिंदुस्तान है’ असे त्याने म्हटले आहे.

तर अभिनेता जितेंद्र जोशीने कंगनाला तंबी देत एक सल्ला दिला. ‘ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, मान दिला आणि जगण्याला अर्थ दिला त्या माझ्या मुंबई शहराचा मला अभिमान आहे. जे जे आले त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवाला आहे या शहराने. कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका.’ #ILoveMumbai

https://twitter.com/Jitendrajoshi27/status/1301573953668800512?s=20

आघाडीची मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने कंगनाच्या मंबई विषयीच्या वक्तवयावर आपल्या ट्विटमध्ये फक्त,’मुंबई मेरी जान!’ असं म्हणतं #कर्मभूमी #ILoveMumbai #विषयसंपला हे हॅशटॅग वापरले आहेत.

तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी कंगनाच्या मुंबईला बदनाम करणाऱ्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. ‘ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?,’ असा प्रश्न अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी विचारला आहे.

https://twitter.com/Priya_berde/status/1301448816495751169?s=20

याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने कंगनाला चांगलंचं झापलं. ‘जिस थाली में खाना उसी मे छेद करना. आमच्या मराठीत पण अशीच एक म्हण आहे…..ज्या ताटात खातात त्यातच ***** मुंबई आमचं प्रेम आहे. विषयच नाही! ‘ असं म्हणतं तेजस्विनी पंडितने कंगनाला चांगलंच सुनावलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.