Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीबाबत खरी माहिती समोर

0
1
Saif Ali Khan Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Saif Ali Khan Attack – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आणि अटकेतील आरोपी संबंधित प्रकरणात एक मोठा बातमी समोर आला आहे. सुरुवातीला अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळे असल्याच्या चर्चा होत्या, पण पोलीस चौकशीतून मिळालेल्या एफएसएल रिपोर्टनुसार, हल्ला करणारा आणि अटक केलेला आरोपी एकच असल्याची माहिती समोर आली आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आरोपीची फेशियल रिकग्निशन टेस्ट –

19 जानेवारी 2025 रोजी, ठाणे येथून शरीफुल याला सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर, शरीफुलचे वकील कोर्टात अर्ग्युमेण्ट (Argument) करत होते की अटक केलेला आरोपी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील हल्लेखोर वेगळे आहेत. वकिलांनी हेही सांगितले की, पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे. पण एफएसएल रिपोर्ट आणि पोलिसांच्या तपासानंतर, हे स्पष्ट झाले की अटक केलेला आरोपी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती एकच आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीची फेशियल रिकग्निशन टेस्ट केली आणि त्यात आरोपीचा चेहरा, फिंगरप्रिंट्स, आणि फुटप्रिंट्स मॅच झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित (Saif Ali Khan Attack)

शरीफुलच्या वकिलांनी पोलिसांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांचा दावा होता की पोलिसांनी अटकेच्या वेळी कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता. आता, अटक केलेला आरोपी आणि हल्ला (Saif Ali Khan Attack) करणारा व्यक्ती एकच असल्याचे समोर आली आहे.

हे पण वाचा :  अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर वाढणार ? पहा काय आहेत आजचे सोन्याचे भाव ?

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज