रिंकू राजगुरूची ‘अमेझॉन प्राईम’वरही सैराट एंट्री; झळकणार ‘या’ चित्रपटात

मुंबई । ‘सैराट’ चित्रपटाच्या धमाकेदार यशानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनं रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या सिनेमाचं यश इतकं प्रचंड होतं की रिंकूनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. सैराटनंतर बरेच सिनेमे तिला मिळाले. यानंतर तिची बोललीवूडमध्ये थेट एंट्री ‘हंड्रेड’ या हिंदी वेब सीरिजने झाली. मात्र, आता रिंकू अमेझॉन प्राइमवरील एका चित्रपटात झळकणार आहे.

‘अनपॉज्ड’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘अनपॉज्ड’ या चित्रपटासाठी पाच बडी मंडळी एकत्र आली आहेत. राज एंड डीके, निखिल अडवाणी, तनिष्ठा चटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो यांनी एकत्रितपणे हा चित्रपट बनवला आहे. यात पाच लघुपट एकत्रित आणण्यात आले आहेत.

‘अनपॉज्ड’ चित्रपट येत्या १८ डिसेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. यात ‘ग्लिच’, ‘अपार्टमेंट’, ‘रॅट-ए-टॅट’, ‘विषाणू’ आणि ‘चाँद मुबारक’ लघुपटांचा समावेश आहे. यातील ‘रॅट ए टॅट’ या लघुपटात रिंकू राजगुरू पहायला मिळणार आहे. याचं दिग्दर्शन लिलेट दुबेनं केलं आहे. रिंकूशिवाय तनिष्ठा चॅटर्जीदेखील यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून, ती चाहत्यांशी संवाद साधत असते.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’