लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता येणार नवीन योजना; महिलांना मिळणार मोठी संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने या वर्षी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना त्यांनी दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याच्या देखील सांगितले. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. सरकारच्या या योजनेचे संपूर्ण राज्यभर कौतुक आहे. परंतु या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे आणि कर्जा दात्यांच्या पैशातूनच हे योजनेचे पैसे जात आहेत. अशी टीका विरोधकांनी केलेली आहे. त्यांना काम द्या अशी मागणी देखील विरोधकांनी केली. तरी देखील महायुती सरकारने या सगळ्याकडे अजिबात लक्ष न देता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच ठेवलेली आहे.

अशातच आता महिलांसाठी सरकारकडून आणखी एक नवीन योजना आणली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देणार आहेत. या उपक्रमा अंतर्गत जवळपास 5000 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे.

सक्षम भगिनी योजनेची सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री योजना आणली. त्यामुळे महिलांना आर्थिक मदत देखील केली जात आहे. परंतु आता नवीन सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केलेली जात आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना रोजगार मिळणे हा या योजनेचा मुख्य योजना आहे. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळून देण्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे.

या उपक्रमांतर्गत शहरातील महिलांनी तयार केलेले पदार्थ वस्तू ऑर्डर नुसार वितरकांपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची काम देखील केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना गरज वस्तू तयार करण्याची आणि कोणालाही त्रास न देता उत्पन्न मिळवण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे. या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनण्यास मदत होईल, असे म्हणून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.