कराड | कराड तालुक्यातील माैजे साकुर्डी येथील सुपुत्र व मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी कृष्णात रामचंद्र यादव यांना अग्निशमन सेवेचे राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान करण्यात आले. मुंबई येथे महापाैर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुंबईतील फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीखाली सापडलेल्या अनेक नागरिकांची सुखरूप सुटका केल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे. मुंबई महानगरपालिकेत श्री. यादव हे 1993 च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासकीय कामकाज चोखपणे बजावताना बाजूही ते समर्थपणे सांभाळतात. अग्निशमन दलाचे मुख्यालय असलेल्या भायखळा अग्निशमन केंद्राचे कार्यभारी पद त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळले. 2019 ऑपरेशनलमध्ये सांगली येथे आलेल्या महापुरात मदतीसाठी धावून गेलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्याचबरोबर मुंबईतील पोर्ट परिसरातील भानुशाली इमारत कोसली होती. त्याखाली फसलेल्या लोकांची सुटका करण्याची मोलाची कामगिरी त्यांच्यासह सहकाऱ्यांनी बजावली होती. त्या वेळी श्री. यादव व त्यांच्या पथकाने जिवाची बाजी लावून तेथे कामगिरी बजावली होती. त्याची दखल घेऊन त्यांचा राष्ट्रपती शौर्य पथकाने भारत सरकारने सन्मान केला.
कृष्णात यादव यांना पदक मिळाल्याने माैजे साकुर्डीचे सरपंच अॅड. विश्वासराव निकम, उपसरपंच सुहास जाधव, निवासराव शिंदे, लक्ष्मण पाटील-निकम, बबन जाधव, गोविंद डोंगरे, यासिम मुलाणी, दादासो उंदाडे, मसुनाथ रसाळ, दादामिय्या काशिद यांनी अभिनंदन केले.
कृष्णात यादव सामाजिक कार्यातही अग्रेसर
कृष्णात यादव यांनी साकुर्डी येथील जोतिर्लिग मंदिरासाठी 3 लाख 33 हजार रूपयांची देणगी दिली आहे. तर गावातील शाळांना लाखो रूपये देणगी दिली. गावातील प्रत्येक मंदिराच्या उभारणीस त्यांनी हातभार लावलेला आहे. स्वतः च्या वडिलांच्या वर्षश्राध्दानिमित्त पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ग्रामस्थांना 1 हजार झाडांचे वाटप केले होते. कोरोना महामारी काळात माैजे साकुर्डी व वस्ती साकुर्डी येथे आॅक्सिजन मशिन देवून सहकार्य केले. पूरग्रस्तांनाही मदत केलेली आहे.




