Salary Account Benefits | जो व्यक्ती नोकरी करतो, त्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असते. दर महिन्याला त्याचा पगार त्या सॅलरी अकाउंट मध्ये जमा होत असते. काही कंपन्या या त्यांच्या कर्मचाऱ्यांचे थेट सॅलरी अकाउंट उघडतात. त्यामुळे या सॅलरी अकाउंटचे कर्मचाऱ्यांना अनेक फायदे देखील मिळतात. सॅलरी अकाउंटची सगळ्यात फायद्याची गोष्ट म्हणजे हे अकाउंट तुम्ही झिरो बॅलन्स वर देखील चालू करू शकता. आता सॅलरी अकाउंट (Salary Account Benefits) असल्यास कोणते फायदे मिळतात हे आज आपण बनवून घेणार आहे.
झिरो बॅलन्स सुविधा | Salary Account Benefits
नोकरी करणारा प्रत्येक माणूस हा सॅलरी अकाउंट चालू करत असतो. या सॅलरी अकाउंटला झिरो बॅलन्स अकाउंट असे देखील म्हणतात. म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये काहीच पैसे नसतील तरी देखील तुमचे पैसे कापले जात नाहीत.
कमीत कमी पैसे ठेवू शकता
सर्वसामान्य व्यक्ती नोकरी करत असेल, तर ती व्यक्ती सेविंग अकाउंट उघडते. काही लोक सॅलरी अकाउंट देखील चालू करतात. सेविंग अकाउंटमध्ये कमीत कमी पैसे ठेवण्याची लिमिट असते. परंतु सॅलरी अकाउंटमध्ये कमीत कमी पैसे ठेवण्याची अट नाही.
ओवर ड्राफ्ट सुविधा
जर तुमचे सॅलरी अकाउंट दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष चालू असेल, तर तुम्हाला ओवर ड्राफ्टची सुविधा मिळते. या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेची लिमिट दोन महिन्याच्या पगाराएवढी असते. याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसतील, तरी देखील तुम्हाला लिमिट पर्यंत पैसे काढता येणार आहे.
फ्री एटीएम सुविधा
सॅलरी अकाउंट वर काही पब्लिक सेक्टरच्या बँकांकडून फ्री एटीएम दिले जाते. यामध्ये एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक यांसारख्या बँका तुम्हाला फ्री एटीएम कार्ड देतात.
लोन सुविधा | Salary Account Benefits
सॅलरी अकाउंट असेल तर तुम्हाला कार लोन, होम लोन वर अनेक स्पेशल ऑफर देखील मिळतात. तुम्हाला लोन देखील कमी व्याजदरात मिळते.
फ्री पासबुकची सुविधा
सॅलरी अकाउंट असणाऱ्या व्यक्तींना अनेक बँका मोफत पासबुक तसेच चेक बुकची सुविधा देतात. तसेच आणि सॅलरी क्रेडिट झाल्यानंतर येणाऱ्या एसएमएसवर देखील कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही.
इन्शुरन्स सुविधा
जर एखाद्या व्यक्तीचे सॅलरी अकाउंट असेल आणि अचानक त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या नातेवाईकांना तसेच घरच्यांना 20 लाख रुपयांचा इन्शुरन्स देखील मिळतो. ही सुविधा प्रत्येक बँकेमध्ये सॅलरी अकाउंट असणाऱ्या व्यक्तीला लागू होते.