Salary Advance Loan | सॅलरी ऍडव्हान्स लोन म्हणजे काय? आकारले जाते इतके व्याज; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Salary Advance Loan | अनेक वेळा माणसाला अत्यंत इमर्जन्सी परिस्थिती येते. आणि अशा परिस्थितीत आर्थिक गरज मिळणे खूप गरजेचे असते. अचानक एवढी मोठी पैशांची गरज लागल्याने आपण आपले मित्र किंवा नातेवाईकांकडून उसने पैसे घेतो किंवा बँकेतून कर्ज घेतो. बँकेतून घेतलेल्या कर्जाचे आपल्याला व्याज देखील भरावे लागते. परंतु त्यावेळी आपली गरज जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे आपण ते कर्ज घेण्यास तयार देखील होतो

आज काल लोकांचा वैयक्तिक कर्ज घेण्याकडे जास्त कल झालेला आहे. परंतु जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुम्हाला दर महिन्याला पगार मिळत असेल तर त्यावर तुम्हाला सॅलरी ॲडव्हान्स लोन (Salary Advance Loan) देखील मिळू शकते. परंतु आता हे सॅलरी ऍडव्हान्स लोन नक्की कसे आहे याचे तुम्हाला कसे फायदे होतात आणि किती व्याज आकारले जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत. अनेक कंपन्या या अडचणीच्या काळात त्यांच्या कर्मचाऱ्यांना कर्जावर ऍडव्हान्स पगार देतात. परंतु आपण आता बँकेने दिलेल्या सॅलरी ॲडव्हान्स लोन बद्दल जाणून घेणार आहोत. या मध्ये बँका आणि इतर फायनान्स कंपन्या देखील तुम्हाला सॅलरी ऍडव्हान्स देऊ शकतात.

सॅलरी ऍडव्हान्स लोन | Salary Advance Loan

सॅलरी ॲडव्हान्स लोन हे भारतातील लोकांसाठी उपलब्ध असलेला एक कर्जाचा प्रकार आहे. या कर्जावरील व्याजदराची गिनती ही मासिक किंवा दररोज देखील केली जाते. यासाठी वेगवेगळ्या बँकेच्या अटी आणि शर्ती वेगळेवेगळे असू शकतात. अडचणीच्या वेळेस सॅलरी ॲडव्हान्स लोन हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरते. कारण काही मिनिटात किंवा काही तासातच आपल्याला हे लोन मिळते. जर तुमच्यासाठी अत्यंत इमर्जन्सी आर्थिक परिस्थिती आली तर तुमच्यासाठी सॅलरी ॲडव्हान्स लोन हा खूप चांगला पर्याय आहे. आपल्या देशामध्ये अशा अनेक वित्तीय कंपन्या आणि बँक आहेत ज्या पगाराची आगाऊ कर्ज म्हणजे सॅलरी ॲडव्हान्स म्हणून देतात. परंतु हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. तसेच या अर्जासाठी बँकेत जाण्याची तुम्हाला गरज भासत नाही. तुम्ही अगदी घर बसल्या हे कर्ज मिळू शकता.

व्याज किती आकारले जाते ? | Salary Advance Loan

अर्ली सॅलरी, लोन टॅब तसेच कॅश कुमार क्विक क्रेडिट,फ्लेक्स सॅलरी आणि क्रेडिट बाजार या महत्त्वाच्या वित्तीय कंपन्या देखील तुम्हाला सॅलरी ॲडव्हान्स लोन देतात. यावर तुम्हाला दर महिन्याला 2.5% व्याज आकारले जाते. यातून तुम्हाला कमीत कमी 8 हजार रुपये ते जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची रक्कम कर्जाच्या स्वरूपात मिळते.