नवी दिल्ली । महागाई भत्ता (Dearness Allowance), HRA आणि TA मध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिल्यानंतर केंद्र सरकार नवीन वर्षात आणखी एक बंपर पगारवाढीचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन किंवा मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी लोक अधिकाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची विनंती करत आहेत. आता अखेर, केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या सादरीकरणापूर्वी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टर
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आगामी अर्थसंकल्पाच्या खर्चात पगारवाढीचा समावेश केला जाणार आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तर वाढ होईलच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनातही वाढ होईल.
सध्या, पगाराची गणना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टरवर केली जाते आणि त्यानुसार मूळ वेतन 18,000 रुपये आहे. मात्र, सरकारने प्रस्तावित 3.68 टक्के फिटमेंट फॅक्टरला सहमती दर्शवल्यास, मूळ वेतन 8000 रुपयांनी वाढेल आणि 26,000 रुपयांपर्यंत पोहोचेल.
लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यातील शेवटच्या संवादादरम्यान, कॅबिनेट सचिवांनी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.