हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये श्री काशी विश्वनाथ मंदिराचा (Kashi Vishwanath Temple) देखील समावेश आहे. आता याच मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना 90 हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर कनिष्ठ पुजाऱ्यांना 80 हजार तसेच सहाय्यक पुजाऱ्यांना 65 हजार रुपये मानधन देण्यात येईल. काशी विश्वनाथ मंदिरात काम करणाऱ्या या पुजाऱ्यांना मानधन देण्यासंदर्भात न्यासच्या 105 व्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर सर्वांनीच एकमत दर्शवल्यामुळे पुजाऱ्यांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पुजाऱ्यांची एकूण 50 पदे असतील. या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचबरोबर सर्व संस्कृतच्या विद्यार्थायंना श्री काशी विश्वनाथ मंदिरात फ्री ड्रेस आणि पुस्तके वाटण्यात येतील. तसेच या मंदिरामध्ये पहिल्यांदाच संस्कृत ज्ञान स्पर्धा भरवण्यात येईल. याचबरोबर, संपूर्णानंद संस्कृत विश्व विद्यालयाला अनुदान दिले जाईल.
यापूर्वी 1983 साली काशी विश्वनाथ मंदिर ताब्यात घेतल्यानंतर पुजारी सेवा नियमावली मागे पडली होती. मात्र आता बदलत्या काळानुसार या नियमावलीत देखील बदल करण्यात आले आहेत. या नियमावलीनुसारच काशी विश्वनाथ मंदिरातील मुख्य पुजार्यांना 90 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. तर कनिष्ठ पुजाऱ्यांना 80 हजार रुपये मानधन दिले जाईल. तसेच, सहाय्यक पुजाऱ्यांना 65 हजार रुपये मानधन दिले जाईल.