‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी होकार दिला आहे. त्याच्यासोबत कतरिना या चित्रपटात काम करणार आहे. पुढच्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्यात अॅक्शनचा पुरेपूर भरणा असेल. सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर ठरेल”, अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषकाने दिली.

मनीष शर्मा यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘फॅन’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment