सलमानने संदीप किच्चाला दिले सर्वात महागडे गिफ्ट !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । बॉलिवूडचा दबंग खान सलमान नेहमीच अनेकांना मदत करत असतो. बऱ्याच वेळा तो महागड्या भेटवस्तू देताना देखील दिसतो. नुकताच सलमानने ‘दबंग ३’चा कोस्टार संदीप किच्चाला एकदम खास अशी भेटवस्तू दिली आहे. संदीपने सलमानने दिलेल्या भेटवस्तूचा फोटो शेअर करत सलमानचे आभार मानले आहेत.

 

 

संदीपने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने शानदार असे लेदर जॅकेट परिधान केले आहे. या जॅकेटच्या पाठीमागे सलमानच्या डॉगचे चित्र आहे. सलमान त्याला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे.

 

 


‘मला हे जॅकेट घालताना सलमान सर म्हणाले की मी कधीच विचार केला नव्हता की मी या जॅकेटपासून दूर जाईन’ हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे. ‘सलमानने या जॅकेटवर त्याच्या आवडत्या पाळीव प्राण्याचे चित्र काढून घेतले होते. ज्या गोष्टींच्या आपण फार जवळ असतो त्या गोष्टींचे महत्त्व मला माहित आहे’ असे संदीपने पुढे लिहिले आहे.

Leave a Comment