दिशा पाटनी सोबतच्या Kissing सीनवर सलमान खानचा मोठा खुलासा; म्हणाला…(Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : बाॅलिवुड अभिनेता सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा अभिनय असणारा ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये पहिल्यांदाच सलमान खान किस करताना दिसला आहे. सलमान खानने प्रथमच एका चित्रपटात लिप किसिंग सीन दिला असल्यानं हा व्हिडिओ सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झाला. आता या सिनेमातील दिशाबरोबरच्या किसिंग सीनबाबत सलमान खानने मोठा खुलासा केला आहे. सदर किसिंग सीन दिशासोबत नसून, तो एका टेपवर आहे अस सलमानने सांगितले आहे.

सलमान खान फिल्म्सने नुकताच चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज केला आहे. त्यामध्ये सलमान आणि दिशाच्या त्या किसिंगबद्दलचे सत्य समोर आले आहे. याआधी या किसिंग सीनबद्दल एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दिसून आले होते की दिशाच्या ओठांवर एक टेप आहे व सलमान खान त्या टेपवर किस करत आहे. मात्र ज्याप्रकारे या सीनचे चित्रीकरण केले आहे, ते पाहून असे वाटते की सलमान खान दिशाच्या ओठांवर किस करत आहे. आता मेकिंग व्हिडीओ मध्ये सलमान खानने तो दिशाच्या ओठांवर नाही तर, टेपवर किस करत असल्याचे सांगितले आहे.

https://www.instagram.com/tv/COU1H4gjf_C/?igshid=8u6vnvgbc2px

या मेकिंग व्हिडीओमध्ये चित्रपटाचे शुटींग कसे केले गेले हे दाखवले आहे. विशेषतः यामध्ये एक्शन सिन्स कसे शूट केले हे पाहणे रंजक आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर व त्यानंतर 2 गाणी रिलीज केली आहेत, ज्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 13 मे रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये तसेच झी​​-5 आणि झी सिनेप्लेक्स सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘पे पर व्ह्यू’ नुसार प्रदर्शित होईल

Leave a Comment