किंग खान’च्या ‘पठाण’ मध्ये भाईजान करणार ग्रँड एन्ट्री; सोशल मीडियावर चर्चांना आले उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता किंग खान अर्थात शाहरूख खानच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटाची अद्यापतरी अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र, त्याचे चाहते या चित्रपटाची आ वासून प्रतीक्षा करीत आहेत. त्याचे कारण असे कि तब्बल तीन वर्षांनंतर शाहरूखने कोणतातरी एक चित्रपट करण्यासाठी स्वीकृती दिली आहे. त्यामुळे ‘पठाण’ बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत अगदी पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाबाबत अनेक बातम्या पसरताना दिसत आहेत. त्यातली लेटेस्ट आणि मसालेदार बातमी म्हणजे ‘पठाण’मध्ये शाहरुखसोबत भाईजान अर्थात सलमान खानही झळकणार आहे. चित्रपटात हे दोघे रशियन माफियांशी एकत्रितपणे लढताना दाखवले जाणार आहेत, असे वृत्त आहे.

यात टायगर असलेला सलमान शाहरूखच्या मदतीला धावून येतो, असा चित्रपटाच्या कथानकाचा एक क्रम ठरवण्यात आला आहे. आता सलमान आला म्हणजे त्याची ग्रॅंड एन्ट्री होणे अगदी साहजिकच आहे. त्याच्या सगळ्या चित्रपटांत हा साऊथ स्टाईल तडका असतोच असतो. त्यामुळे सलमानची एन्ट्री खास हेलिकॉप्टरमधून दाखवण्यात येणार आहे, अशीही चर्चा जोरो शोरोसे सुरु आहे. बरे तो असा चित्रपटात आला आणि नुसताच ‘हॅलो हाय, चलो बाय’ करून परतलेला प्रेक्षकांना कसं बरं चालेल? त्यामुळे त्याच्यासाठी खास ऍक्‍शन सीनचा भरणाही केला जाणार आहे.

या चित्रपटात सलमानची तब्बल २० मिनिटांचे ऍक्शन सिन असणार आहेत. शाहरूख आणि सलमान तसे मित्रच आहेत. मध्यंतरी त्यांचे थोडे नाही नाही थोडे जास्तच बिनसले होते. पण नंतर ते पुन्हा एकत्र आलेच. आता शाहरूखचे चित्रपट आधीइतके बॉक्स ऑफिसवर फारसे चालत नाहीत. याबाबत निश्चितच शाहरुखलाही कल्पना आल्यामुळे त्याने गॅप घेतला.

प्रत्येक सुपरस्टारच्या करिअरमध्ये हे असे वळण येतेच. सध्या शाहरूख याच वळणावरून जात आहे. त्यामुळे बराच विचार केल्यावर ‘पठाण’ या चित्रपटासाठी तो तयार झाला आहे. दरम्यान यात कोणताही मसाला कमी पडायला नको, याची योग्य ती दक्षता घेतली जाते आहे. त्यामुळेच टायगरसोबत ही मनोरंजनाची उडी घेतली जात आहे. साधारण मिळत असलेल्या बातम्या तर अशाच स्वरूपाच्या आहेत. मात्र यात किती खरे आणि किती खोटे हे देखील लवकरच कळेल.

Leave a Comment