बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रमादरम्यान चाकू हल्ला!

Salman Rushdie Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – न्यूयॉर्कमधील चौटौका या ठिकाणी भाषण देण्यापूर्वी कादंबरीकार सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हाती आलेल्या माहितीनुसार, चौटाका इन्स्टिट्यूटच्या स्टेजवर एका व्यक्तीने रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर तुफान हल्ला केला. रश्दींची (Salman Rushdie) ओळख करून देत असताना या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर रश्दी हे जमीनीवर कोसळले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सलमान रश्दी (Salman Rushdie) हे बुकर पुरस्कार विजेते लेखक आहेत.

कोण आहेत सलमान रश्दी?
सर अहमद सलमान रश्दी (Salman Rushdie) यांचा जन्म 19 जून 1947 मध्ये झाला. ते ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि लेखक आहेत. त्यांच्या मिडनाईट्स चिल्ड्रेन या दुसऱ्या कादंबरीला 1981 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांची चौथी कादंबरी सॅटानिक व्हर्सेस ही वादाचं केंद्र ठरली होती. या कादंबरीला अनेक मुस्लिम देशांनी जोरदार विरोध केला होता. या कादंबरीविरोधात काही भागात तर हिंसक आंदोलनेसुद्धा झाली होती.

या पार्श्वभूमीवर रश्दी (Salman Rushdie) यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती. तसंच 1989 मध्ये ईराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खौमैनी यांनी एक फतवाही काढला होता. या पार्श्वभूमीवर रश्दी (Salman Rushdie) यांना तब्बल एक दशक भूमिगत व्हावं लागलं होतं. इराणने रश्दींना मारणाऱ्यास $3 दशलक्षपेक्षा जास्त बक्षीस देणार असे जाहीर केले होते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर