Salt Bath Benefits | जेवणामध्ये मीठ ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. मिठाचे प्रमाण कमी जास्त झाले, तरी जेवणाची चव बिघडते. जेवणाला अधिक चविष्ट बनवण्याचे काम मीठ करते. त्याचप्रमाणे शरीरासाठी देखील महत्त्वाचे आहे. परंतु खाण्या व्यतिरिक्त मिठाचे इतरही अनेक फायदे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीर निरोगी होते. तुम्ही जर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिठाचा वापर केला, तर तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. खारट पाण्याने शरीराला (Salt Bath Benefits) अनेक फायदे होतात मिठाच्या पाण्यामुळे त्वचेपासून ते सर्दी खोकल्यापर्यंत अनेक समस्या दूर होतात. आता मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने, कोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.
स्नायू शिथिल करणारे | Salt Bath Benefits
गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ केल्याने स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. त्यामुळे दिवसभराचा थकवा निघून जातो. विशेषत: झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास झोप चांगली लागते.
सर्दी आणि खोकला निघून जाईल
गरम पाण्यात दोन चमचे मीठ टाकून आंघोळ केल्याने ताप, खोकला, सर्दीपासून आराम मिळतो. यामुळे नाक आणि घशाचे संक्रमण दूर होण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर
पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ केल्याने खाज, एक्जिमा आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.
रक्ताभिसरण वाढते.
गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे स्नायूंमध्ये रक्ताभिसरण वाढू शकते.
वजन कमी
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी निघून जाते ज्यामुळे जास्त चरबी जाळते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय थकवाही कमी होतो.
मानसिक शांती | Salt Bath Benefits
रोज गरम पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने मानसिक शांती मिळते, तणाव दूर राहतो.