Sam Pitroda: दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात तर ईशान्य भारतीय चिनी दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने नवा वाद?

Sam Pitroda

Sam Pitroda: इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण भारतीय आफ्रिकन तर ईशान्य भागातील लोक चिनी दिसतात , पण आम्ही सगळ्यांच्या भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करतो. आम्ही सगळ्यांचा आदर करतो. असं त्यांनी म्हंटल आहे. भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र त्यांच्या या विधानानंतर विरोधकांच्या हातात आयत कोलीत मिळालं आहे असं म्हणावं लागेल.

सॅम पित्रोदा म्हणाले, भारत विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या विविध भागामध्ये राहणारे लोक जगातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांप्रमाणे दिसतात. त्यामुळे याचा काहीही फरत पडत नाही. भारताच्या पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात. पश्चिमेकडचे लोक अरबी वाटतात. उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन्ससारखे वाटतात आणि दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन वाटतात, पण आपण सगळे एक आहोत असं त्यांनी म्हंटल. सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी भर लोकसभा निवडणुकीच्या काळात असं विधान केल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

वारसा टॅक्सच्या वक्तव्यावरुन आले होते चर्चेत- Sam Pitroda

यापूर्वी सॅम पित्रोदा यांनी वारसा टॅक्सवरून वादग्रस्त विधान केलं होते. अमेरिकेत वारसा टॅक्स आकारला जातो असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा दाखला देत भाजपने काँग्रेस विरोधात रान उठवलं होते तसेच कडक शब्दात समाचार सुद्धा घेतला होता. भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्याला संपत्ती सर्वेशी जोडून राहुल गांधीवर सडकून टीका केली होता. त्यानंतर सॅम पित्रोदा यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. जो अर्थ काढला, ते बोललो नाही असं ते म्हणाले.