कंगना मुस्लिमांना टार्गेट करतेय; अबू आझमींचे टीकास्त्र

मुंबई । केवळ महिला असल्यामुळे काहीही बोलण्याचा कंगनाला अधिकार नाही. ऍक्शनला रिऍक्शन होणारच, असा टोला लगावतानाच कंगना महाराष्ट्राचा अपमान करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही, असा इशारा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी कंगना राणावतला दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अबू आझमी यांनी हा इशारा दिला. कंगना मुस्लिमांना टार्गेट करत आहे. तिला बेशर्म म्हणणं चुकीचं नाही. स्थिर पाण्यात दगड मारला तर त्याचे तरंग उठणारच. ऍक्शनला रिऍक्शन होणारचं. त्यामुळे मी काही चुकीचं बोललं नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं आझमी यांनी सांगितलं.

बॉलिवूडमध्ये इस्लामिक डॉमिनेशन आहे, असं कंगनाने म्हटलं होतं. त्यावरही आझमी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंगनाचं इस्लामिक डॉमिनेशन म्हणणं मनाला खूप लागलं. स्त्री आहे म्हणून ती काहीही म्हणेन का? कंगनाने मुस्लिमांना टार्गेट केलं आहे. खरे तर कंगना भाजप आणि संघाची भाषा बोलत आहे. त्यामुळेच तिला सुरक्षा देण्यात आली आहे. इथे लोकांना मारलं जातंय, त्यांना सुरक्षा मिळत नाही अन् केंद्र सरकार मात्र तिला वाय दर्जाची सुरक्षा देत आहे. कारण ती आरएसएसची भाषा बोलत आहे. खरेतर तिने संविधानाची भाषा बोलली पाहिजे, असं आझमी म्हणाले.

यावेळी त्यांनी कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईचं समर्थनही केलं आहे. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई ही सूडाची कारवाई नाही. कुणी तरी तक्रार केली. त्यावर पालिकेने ऍक्शन घेतली आहे. त्यात चुकीचे काय?, असा सवाल त्यांनी केला. कंगनाच्याच कार्यालयावर कारवाई का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मुंबईत अनेक अनधिकृत इमारती आहेत. ज्याची ज्याची तक्रार केली जाते, त्यावर कारवाई होतेच, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like