हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसेने महाधिवेशनात हिंदुत्वाच्या घेतलेल्या भूमिकेवर सामनाच्या आजच्या(२५जानेवारी) अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. आता याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी सामना बंद करण्याची भूमिका घेतली आहे. आजपासून सामना बंद बंद बंद असे त्यांनी ट्विटरवरुन म्हंटले आहे. अमेय खोपकर यांच्या पवित्र्यामुळे आता मनसे सैनिकांकडून सामना बंदची मोहीमच राबविण्यात येत आहे.
अमेय खोपकर यांनी एक ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “23 जानेवारी 1989 रोजी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत आमच्या घरी नियमित ‘सामना’ येत होता. आम्ही पत्रकारांनी केलेली टीका समजू शकतो, पण रडत राऊतजी आता आगपाखड करत आहेत. त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद.”
23 जानेवारी, १९८९ रोजी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत नियमित ‘सामना’ आमच्या घरी येत होता. पत्रकारांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो, पण रडत राऊत जी आगपाखड आता करत आहेत त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद-अमेय खोपकर
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020
ताज्या बातम्या थेट मोबाईलमध्ये मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”