कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ!! समरजीत घाटगे पवारांची तुतारी हाती घेणार?? मुहूर्तही ठरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरच्या राजकारणात (Kolhapur Politics) मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि कागलचे नेते समरजीत घाटगे ( Samarjit Ghatge) हे लवकरच भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Sharad Pawar Group) प्रवेश करणार आहे अशा चर्चा सुरु आहेत. येत्या २३ ऑगस्टला समरजीत घाटगे कागल येथे (Kagal) कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून या मेळाव्यात ते आपले भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.असं झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. कारण समरजीत घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते मानले जातात.

गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. खरं तर समरजित घाटगे हे कागल मतदार संघाचे भाजपचे नेते आहेत. त्याठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात. मात्र अजित पवारांचा गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर युतीचे संपूर्ण चित्र बदललं . युतीच्या जागावाटपात कागलची जागा हसन मुश्रीफ यांचयाकडे जाण्याची शक्यता आहे. हाच धोका ओळखून राजकीय भवितव्यासाठी समरजीत घाटगे हे पवारांची तुतारी हाती घेणार आहेत असं बोललं जातंय. समरजीत घाटगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरतील, असे सांगितले जात आहे. असं झाल्यास हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित….

२०१९ च्या विधानसभेच्या मागील निवडणुकीत ‘कागल’मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. त्यानंतर ते थेट भाजपमध्ये सक्रिय झाले होते. विधानसभेसाठी त्यांनी तयारीही सुरु केली. मात्र महायुतीच्या जागावाटपात कागलची जागा हसन मुश्रीफ यांनाच मिळण्याचे संकेत अजित पवारांनी दिले होते. कागल मध्ये कार्यक्रमात हसन मुश्रीफ हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. त्यामुळे राजकीय भवितव्यसाठी समरजीत घाटगे हे पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जातंय.