कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश बेळगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिले आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भिडे यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या कालच्या सुनावणीस भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायाधीशांनी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.
येळ्ळूर मधील महाराष्ट्र मैदानावर 13 एप्रिल 2018 ला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी भिडे हजर होते. त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती आणि भिडे यांनी त्या समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याबाबत आवाहन केलं होतं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या, विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवावी, अस वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.