डॉक्टर नालायक अन् लुटारू, ते मारायच्या लायकीचे; संभाजी भिडे पुन्हा बरळले

Sambhaji Bhide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत आपलं लक्ष वेधून घेत असतात. त्यातच आता त्यांनी डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत असे विधान त्यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील कोरोना वरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

संभाजी भिडे म्हणाले, कोरोनात 105 टक्के लोक भीतीनेच मेले. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर …… खोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी या आधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे भिडे यांनी म्हटले होते.