हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे वडील मुस्लिम जमीनदार होते असं चीड आणणारे विधान केलं होते. त्यांच्या या विधानाने राज्यात मोठं पडसाद उमटले. हे प्रकरण अजूनही ताज असतानाच आता संभाजी भिडे यांनी पंडित नेहरूंबद्दल (Pandit Nehru) वादग्रस्त विधान केलं आहे. अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही असं भिडे यांनी म्हंटल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यवतमाळ विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना संभाजी भिडे म्हणाले, अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही, कोणतंही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले. नेहरूंनी केलेल्या ‘पंचशील’ करारामुळे चीनकडून भारताचा पराभव झाला, तर इशान्येकडील भूभाग हा चीनने घेतला. तो भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत असेही भिडे यांनी म्हंटल. हिंदुंना युद्धशास्त्राची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत लष्करी शाळाच काढणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या यवतमाळ येथील व्याख्यानाला अनेक सामाजिक, पुरोगामी, आंबेडकरवारी संघटनांनी जोरदार विरोध केला. भिडेंचे शहरात लागलेले बॅनर्सही फाडले होते. यापूर्वी महात्मा गांधी यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. संभाजी भिडे यांच्याकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. राष्ट्रपित्याबद्दल असं विधान करूनही हा माणूस बाहेर फिरुच कसा शकतो असं म्हणत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी भर अधिवेशनात केली होती. त्यानंतर याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.