औरंगाबाद प्रतिनिधी । संभाजी भिडे तथा भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भिडे गुरुजींच्या प्रतिमेला शेण लावून आंदोलन करण्यात आलं. भिडे यांची बेताल वक्तव्य अशीच सुरु राहिल्यास आरपीआय कार्यकर्त्यांकडून त्यांना धडा शिकवण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी संशयित आरोपी म्हणून मनोहर भिडे यांची बराच काळ चौकशी सुरु आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने हिंदू युवकांना संघटित करून त्यांना कट्टरतावादी शिक्षण देण्याचा आरोपही मनोहर भिडे तथा भिडे गुरुजींवर लावला जातो. राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही अशी तक्रारही सामान्य नागरीकांनी केली आहे.
Home महाराष्ट्र संभाजी भिडेंच्या प्रतिमेला शेणाचा प्रसाद ; बुद्धांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आरपीआय आक्रमक