Wednesday, February 8, 2023

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; ‘या’ दिवशी आमरण उपोषणाला बसणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ठाकरे सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नसून यामुळे मी 26 फेब्रुवारी ला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे अशी भूमिका छत्रपती संभाजी राजे यांनी मांडली.

संभाजीराजे म्हणाले, ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं, त्यानंतर अनेकवेळा आंदोलनं केली, पण कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत मी आक्रमक होतो, पण आता मी उद्विग्न झालो आहे, असं सांगत संभाजीराजे यांनी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. आता मी उद्विग्न झालो आहे, असं सांगत संभाजीराजे यांनी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.