हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अगदी तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसत आहे. यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता यावर्षी निवडणुकांमध्ये नक्की काय निकाल लागेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काही पक्षांकडून उमेदवाराच्या नावाच्या अधिकृत नावाची घोषणा होताना देखील दिसत आहे. परंतु आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय झालेला आहे. आणि या राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाने नोंदणी देखील झाली असेल. त्यांनी चिन्ह देखील ठरवलेले आहे.
महाराष्ट्रात नव्याने उद्या झालेल्या या राजकीय पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे. हा पक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आहे. त्यांनी फेसबुक वर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिलेली आहे. या पोस्टद्वारे संभाजीराजांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची तयारी दाखवलेली पाहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकीरणांसह पिनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. याबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवली आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील मतदारांपर्यंत पोहोचवणे, हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, संघटनेचे कार्यकर्ते आणि हितचिंतकाचे कष्ट त्यामुळे राज्याच्या राजकारणाला असलेली एक नवीन आणि सुसंस्कृत पर्यायाची माग आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत परिवर्तन महाशक्ती घेऊन जाईल हे निश्चित जय स्वराज्य.”
छत्रपती संभाजीराजांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केलेली होती. आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या पक्षाचे अधिकृत रित्या नोंदणी देखील केलेली आहे. आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे त्यांच्या पक्षाचे नाव देखील जाहीर केलेले आहे.