चला, अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया; संभाजीराजेंची सरकार विरोधात पहिली मोहीम

Sambhajiraje Chhatrapati Shivsmarak
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) ऍक्शन मोड मध्ये आलेत. बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने संभाजीराजेंच्या पक्षाला नवं नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. डिसेंबर 2016 रोजी भाजप-शिवसेना महायुती सरकारने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता . त्यावेळी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होणार आहेत पण महाराजांचे स्मारक काही दिसेना. हाच मुद्दा पकडून संभाजीराजे छत्रपती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. चला, अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया असं म्हणत संभाजीराजेंनी सरकार विरोधात पहिली मोहीम सुरु केली आहे.

संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हंटल, मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला… असं म्हणत संभाजीराजेंनी एकप्रकारे नवी मोहीमच सुरु केली आहे.

रविवार 6 ऑक्टोबर 2024 , सकाळी 11 वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे मोर्चा आयोजित करणार आहेत . या मोर्चात लाखो शिवभक्त सहभागी होणार आहेत. आंदोलनाद्वारे सरकारच्या धोरणांना विरोध करत , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जलपूजनाच्या ठिकाणी शिवस्मारक शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या आंदोलनामुळे आगामी राजकीय घटनाक्रमावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. छत्रपतींना जनतेचा मोठा पाठिंबा असल्याने राज्य आणि केंद्र सरकार शिवरायांच्या न बांधलेल्या स्मारकावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे.