Sunday, June 4, 2023

संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत? मुंबईत उद्या करणार भूमिका जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान त्यांनी आज सकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होत असल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. आता ते राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती मिळत असून त्याबाबत ते उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

शिवसेनेकडून संभाजीराजेंची उमेदवारी डावलल्यानंतर राज्यसभेच्या निवडणुक ते लढवण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. दरम्यान संभाजीराजेंना राज्यभरातून मराठा समाजातील तरुण व विविध संघटनांकडूनही पाठींबा दर्शवण्यात आला आहार. मात्र, उमेदवारीबाबत व निवडणूक लढवण्याबाबत त्यांच्याकडून अजूनही कोणत्याही प्रकारचे सुचोवत देण्यात आलेले नाहीत.

आता राज्यसभेच्या निवडणुकीबाबत काय भूमिका घेणार याबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेत संभाजीराजेंकडून सांगितले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेसबुक पोस्ट करत दिले ‘हे’ संकेत

राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांनी भूमिका आहे. आता संभाजीराजेंकडून आज एक फेसबुक पोस्ट करत आपल्याला महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय आहे, असे म्हंटले आहे.