Sambhajinagar To Goa Flight : छत्रपती संभाजीनगर ते गोवा केवळ दिड तासात ; इंडिगोची विमानसेवा सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sambhajinagar To Goa Flight : छत्रपती संभाजीनगर ते गोवा असा विमान प्रवास अखेर सुरु झाला आहे. १ जुलै पासून इंडिगोची विमानसेवा सुरु झाली आहे. गोव्यासोबतच नागपूर विमानसेवा सुद्धा सुरु झाली असून त्यामुळे आता कमी वेळामध्ये प्रवाशांना गोवा, नागपूर सारखी ठिकाणं गाठता येणार आहेत. या विमान सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून संभाजीनगर ते गोवा हे आंतर केवळ दिड (Sambhajinagar To Goa Flight) तासात पार करता येणार आहे.

मंगळवार दिनांक एक जुलै रोजी गोव्यासाठी संभाजीनगर होऊन विमानाचे उड्डाण झाले. ‘इंडिया बाय इंडिगो’ या उपक्रमा अंतर्गत छत्रपती सम्भाजीनगरहून गोवा आणि नागपूर साठी विमानांची उड्डाण घेतली गेली. एक जुलै रोजी 63 प्रवाशांनी गोव्यासाठी प्रवास केला. तर नागपूरहून आलेलया विमानात 37 प्रवासी संभाजीनगर मध्ये दाखल झाले. तर संध्याकाळी छत्रपती संभाजी नगर ते नागपूर विमानसेवेद्वारे 38 प्रवाशांनी प्रवास केला. इंडिगो कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गोवा विमान सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महापालिका ( Sambhajinagar To Goa Flight) आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह विमानतळ संचालक शरद येवले, सीआयएसएफचे कमांडर पवनकुमार, इंडिगो विमानतळाचे विमानतळ व्यवस्थापक अनिरुद्ध पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

या शहरात विमानसेवा (Chhatrapati Sambhajinagar To Goa Flight)

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये आता गोवा आणि नागपूर यांची सुद्धा भर पडली आहे. मंगळवारी इंडिगो कंपनीचे एटीआर विमान क्रमांक 6ई 7462 हे विमान नागपूर वरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर लँड झालं आणि या विमानाचे वॉटर कॅनन सॅल्यूटने धावपट्टीवर स्वागत करण्यात आले. या विमानातून 23 प्रवासी उतरले.

उद्योजकांचा वेळ वाचणार ( Sambhajinagar To Goa Flight)

या विमानसेवेचा फायदा उद्योजकांना होणार आहे याच्यात अजिबात शंका नाही. छत्रपती संभाजी नगरहून गोव्यासाठी निघालेल्या पहिल्या विमानामध्ये मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्किल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर म्हणजेच (मासीआ) या लघु उद्योजक संघटनेचे 35 उद्योजक गोव्याला गेले. अगदी दीडच तासात हे विमान गोव्यात पोहोचलं. त्यामुळे उद्योग आणि व्यापार करणाऱ्या व्यक्तींसाठी ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार ( Sambhajinagar To Goa Flight) असून अवघ्या दीड तासात गोवा गाठण शक्य होणार आहे.