संभाजीराजे म्हणतात… आरक्षण गेलं खड्ड्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | आरक्षण गेलं खड्ड्यात असे म्हणून संभाजी राजे भोसले यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची मागणी केली आहे. उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. त्याला दहावीला ९४ टक्के एवढे गुण मिळाले आहेत. या घटनेनंतर संभाजीराजे भोसले यांनी ट्विटर वरून संताप व्यक्त केला आहे.

‘मला वाटतंय की आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? शेत मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही?’ असे सवाल करत संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या आणि इतर प्रश्नांवर भाष्य केलं आहे.

त्याच प्रमाणे त्यांनी सरकारच्या ठायी असणारा दांभिकपणा देखील बोलून दाखवला आहे. भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां? की उगाच मुह में राम, बगल में सूरी असा प्रकार चालू आहे? नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती असे संभाजी राजे म्हणाले आहेत.

Leave a Comment