उदयनराजे कुठेही असतील, त्यांचे स्वागत करतो-छत्रपती संभाजीराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | उदयनराजे कुठेही असतील त्यांचे स्वागत करतो, असे प्रतिपादन राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. सोलापूरात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. विधानसभेच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेत्यांची जोरदार पक्षांतरे सुरु आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक वरीष्ठांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजून कहीजण प्रवेशाच्या वाटेवर आहेत. खासदार उदयनराजेही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा आहे.

[youtube https://www.youtube.com/watch?v=LTcM4fNV_BU&w=560&h=315]

याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले उयनराजे हे आमचे बंधू आहेत. ते कोठेही असले तरी त्यांचे स्वागत करतो. सध्याच्या पक्षांतराबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकीय काही बोलायचे नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीने काढलेल्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेत उदयनराजे दिसले नाहीत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी भेट घेतली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती. उदयनराजे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गड किल्ले भाड्याने देण्याबाबत आपला विरोध असल्याचे सांगत माझी भुमिका मी पेजवर स्पष्ट केली असल्याचे ते म्हणाले.

 

Leave a Comment