हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं त्यांनी म्हंटल. राज्यपालांच्या या विधानानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. या राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा अशी मागणी त्यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, भगतसिंग कोश्यारी असं का बडबडतात हे मला माहित नाही . याना महाराष्ट्रातून बाहेर पाठवून द्या . महाराष्ट्र ही संतांची भूमी असून राज्याचे वैभव असलेल्या महापुरुषांबद्दल घाणेरडे शब्द आणि घाणेरडे विचार घेऊन ये येऊ तरी कसे शकतात?? असा सवाल करत मी तर पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.
शिवराय जुन्या काळातील आदर्श; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/1wImVwG3UF#hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 19, 2022
कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले.