सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
दत्ता जाधव मोक्का प्रकरणाच्या तपासात तीन तीन अधिकारी बदलणे संशयास्पद असल्याचे मत राज्याचे वित्त, गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी कोणाला पाठीशी घालण्यासाठी कोणत्याही अधिकार्याने कृती केली असेल तर प्रकरणाचा फेरविचार करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
सातार्यातील दत्ता जाधव मोक्का केसची माहीती समजली आहे. या केसमध्ये आमच्या पोलिस अधिकार्यांने तपास करून मोक्काचा गुन्हा दाखल केला. त्या आरोपीला अटक केली होती, मात्र तो आरोपी अटकेत असताना जेलमध्ये राहण्याऐवजी सरकारी दवाखान्यात राहिला. या सर्व बाबी समोर आल्या आहेत. या केसमध्ये एक तपास अधिकारी बदलला. त्यानंतर दुसराही अधिकारी बदलला. परंतु नंतर तिसराही तपास अधिकारी बदलण्यात आला. तेव्हा तीन- तीन तपास अधिकारी एका मोक्का केसमध्ये कशासाठी बदलले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान याबाबत मी अधिकृत माहीती वरिष्ठ अधिकार्यांकडून मागितली आहे. तीन अधिकारी बदलले, तपास प्रकरण काढून घ्यायचे, पोलिसांकडून मोक्का काढून घेणे हे संशयास्पद आहे. यामध्ये अनियमतता, हलगर्जीपणा किंवा कोणा अधिकार्यांला पाठीशी घालण्याचा प्रकार झाला असेल तर या सर्व बाबींचा फेरविचार मी करणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा