हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू आणि द वॉल ही खास पदवी मिळवलेल्या राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला 9Samit Dravid) भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारताचा अंडर-19 संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यासाठी समित द्रविडची निवड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत समितने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतलं आहे. त्याच कामगिरीचे फळ म्हणून समित आता भारतीय संघात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सप्टेंबरमध्ये, भारताचा 19 वर्षाखालील संघ ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 2 चार दिवसीय सामने खेळणार आहेत. या मालिकेसाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यात राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला दोन्ही संघात स्थान मिळालं आहे. त्यामुळे वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. एकदिवसीय सामन्यासाठी निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे असून त्यात मोहम्मद अमानला कर्णधारपद देण्यात आले आहे. चार दिवसीय सामन्यांसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली असून, त्यांची धुरा सोहम पटवर्धनच्या खांद्यावर आहे.
कधी आहेत सामने –
ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्ध 19 वर्षांखालील भारतीय संघ एकूण ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना 21 सप्टेंबर, दुसरा सामना 23 सप्टेंबर आणि तिसरा एकदिवसीय सामना 26 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हे तिन्ही सामने पुद्दुचेरी येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेत. तर ४ दिवसीय २ सामनेही खेळले जाणार असून यातील पहिला सामना 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरा सामना ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईत खेळवले जातील.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघ:
रुद्र पटेल, साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पनगालिया (विकेटकीपर), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्धच्या चार दिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघ:
वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा, सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पानगालिया (विकेटकीपर), चेतन शर्मा. , समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन.