नागरिकांच्या मानसिक संतुलनासाठी समर्पण ध्यानयोगाचा पुढाकार, युट्यूबवरुन मोफत प्रसारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर | समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते शिवकृपानंद स्वामी यांच्याद्वारे वर्तमान परिस्थितीच्या संदर्भात सर्व साधकांना लॉकडाउनच्या दरम्यान घरी राहून, सरकारने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार समर्पण ध्यानयोग संस्काराची सर्व ध्यानकेंद्रे व आश्रम बंद करून सरकारला पूर्ण सहयोग केला जात आहे. स्वामी यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या निर्देशांनुसार देश विदेशातील साधक मोठ्या संख्येने घरी राहूनच ध्यान साधना करत आहेत.

वर्तमान परिस्थितीत लोक मानसिक दृष्टीने संतुलित राहावेत याकरता स्वामी श्रीकृपानंद यांच्या २०१८ मध्ये शिर्डीत आयोजित झालेल्या महाशिबिराचे प्रसारण समर्पण अनुभूती या यू-ट्यूब चेनेलवर होत आहे. घरबसल्या व्हिडीओ शिबिराचे १ एप्रिल ते ८ एप्रिल २०२० ह्या कालावधीत संध्याकाळी ६ वाजता प्रसारण केले जाईल अशी माहिती समर्पन ध्यान संस्थेकडून देण्यात आली आहे.

ह्या व्हिडीओ शिबिरात स्वामी, आपल्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे आपल्या सहज सोप्या शैलीत दिल्या गेलेल्या प्रवचनांच्या माध्यमातून ध्यानाचा परिचय, शरीरातील ७ ऊर्जाकेंद्रे अशा विषयांच्या बाबतीत माहितीबरोबरच ध्यानाची सोपी पद्धत शिकवतात. जीवनात शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक लाभ देणाऱ्या या शिबिराचा लाभ देण्यासाठी समर्पण परिवार सर्वांनाच मनःपूर्वक विनंती करत आहे.

समर्पण परिवाराच्या इतिहासात प्रथमच यू-ट्यूब च्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिराचा लाभ घेऊन एका  सकारात्मक सामूहिकतेबरोबर जोडले जाऊ शकते.

आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून शिबिरात सहभागी होऊ शकता.

www.samarpanmeditation.org

http://en.samarpanmeditation.org/main/event/6

https://www.youtube.com/channel/UC_zzw6XU0RaTy2naPVl–4Q

Leave a Comment