हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहे. काल रात्री सुद्धा समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर हा भीषण अपघात झाला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आर्टिगा कारला राँग साईडने येणाऱ्या लिफ्ट डिझायर कारने धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले.
कसा झाला अपघात ? Samruddhi Mahamarg Accident
याबाबत अधिक माहिती अशी कि, ईरटीका कार (क्र. एमएच. ४७. बीपी .५४७८) हि नागपूरहून मुंबईला निघाली होती. तर स्विफ्ट डिझायर कार तिच्या विरुद्ध दिशेला जात होती. नागपूरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्टिगाला राँग साईडने येणाऱ्या सिफ्टची धडक बसली. हि धडक इतकी भीषण होती कि, दोन्ही गाड्या महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. दोन्ही कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण (Samruddhi Mahamarg Accident) अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते.
पघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या मदतीने बचाव कार्य करत दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.या अपघातातील सर्व मृत प्रवाशांचे मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ. उमेश जाधव यांनी दिली.